By  
on  

प्रार्थनाच्या साडीतील अदा करतील फिदा, पाहा Photos

परीची आई नेहा कामत तुम्हाला माहितीय का, असा प्रश्न जर कोणाला विचारला तर अवघा महाराष्ट्र एकसुरात सांगेल अभिनेत्री  प्रार्थना बेहरे म्हणून. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून अभिनेत्री प्रार्थना आणि अभिनेता श्रेयस तळपदे ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या मनावर अल्पावधितच राज्य करतेय. 

प्रार्थना बेहेरे हे मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचं नाव. विविध मराठी सिनेमांमधून प्रार्थनाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. प्रार्थनाचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. ती सोशल  मिडीयावरसुध्दा सतत सक्रीय असते.विविध आऊटफिटमधले मनमोहक फोटो ती चाहत्यांशी शेअर करते. 

प्रार्थनाने चक्क ११ वर्षांनी मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण केले आहे.

झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील कलाकार सहभागी होणार आहे.

या भागासाठी प्रार्थनाने हा खास साडी लुक कॅरी केला होता. 

 

यावेळी तिने पिवळ्या रंगाची सिल्कची साडी परिधान केली होती. 

 

या साडीत प्रार्थना खुपच मनमोहक दिसत होती.

'चला हवा येऊ द्या' मध्ये प्रार्थनाचं हसणं ऐकणं म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असते. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive