'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. पण सध्य ही मालिका एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. या मालिकेतील एका दृश्यामुळे निर्माण झालेल्या वादासाठी निर्माते महेश कोठारे यांनी जाहीर माफी मागितली आहे.
जाहीर माफी #SukhMhanjeNakkiKayAsta pic.twitter.com/tqZJoWX9Xm
— Mahesh Kothare (@maheshkothare) September 16, 2021
या मालिकेच्या 14 सप्टेंबरच्या भागामध्ये सँडी या व्यक्तिरेखेच्या ब्लाऊजवर तथागत गौतम बुद्धांचे चित्र छापण्यात आलं होतं. यामुळे मालिकेचे निर्माते आणि ड्रेस डिझायनर यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी रिपाइं एकतावादीचे नेते भैय्यासाहेब इंदिसे यांनी केली होती. यावर महेश यांनी व्हिडियो शेअर करत जाहीर माफी मागितली आहे. महेश म्हणतात, 'ही चुक जाणीवपुर्वक न केल्याची खात्री देऊ शकतो. पण या चुकीबाबत मी जाहीर माफी मागतो. आपणही क्षमाशीलता दाखवाल अशी आशा आहे. याशिवाय ही चुक पुन्हा घडणार नाही याचीही खात्री तुम्हाला देतो.' अशा आशयाचा व्हिडियो महेश यांनी शेअर केला आहे.