वडिलांसोबत धम्माल थिरकली अभिज्ञा भावे, पाहा Video

By  
on  

छोट्या पडद्यावर अभिज्ञा भावे ही लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रसिध्द आहे. अनेक मालिका आणि नाटकांमधून अभिज्ञाने आपल्या अभिनयाची छाप पाडलीय. सध्या ती पवित्र रिश्ता- २ या प्रसिध्द हिंदी मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकतेय. सोशल मिडीयावर अभिज्ञा सतत सक्रीय असते. अनेक फोटोशूट आणि मित्र-मैत्रिणींसोबतचे धम्माल व्हिडीओ ती नेहमी शेअर करते. पण अभिज्ञाने शेअर केलेला एक रील व्हिडीओ खुपच खास आणि भन्नाट आहे. कारण, यात ती चक्क तिच्या बाबांसोबत थिरकलीय. 

अभिज्ञाने बाबांसोबत मराठी किंवा हिंदी नाही तर थेट हॉलिवूडच्या गाण्यावर ताल धरला आहे. तिचे बाबा आणि ती जस्टिन बिबरच्या गाण्यावर धम्माल एन्जॉय करतायत. त्यांची ही डान्स मस्ती अभिज्ञाच्या आईने फोनमध्ये शूट केली आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. 

अभिज्ञाने इन्स्टाग्रामवर शेअर केलला ह्या व्हिडीओला आत्तापर्यंतचा बेस्ट रील व्हिडीओ असं म्हटलं आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे.

Recommended

Loading...
Share