फिटनेस फ्रिक प्रिया बापटचा हा बर्थ डे रील व्हिडीओ पाहिलात का?

By  
on  

मराठीतील आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट नेहमीच आपल्या सौंदर्याने आणि सशक्त अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकते. हिंदीतही प्रियाचा तेवढाच दबदबा आहे. सिटी ऑफ ड्रीम्सच्या दुस-या सीझनमधून प्रियाने पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवलं आहे. पोर्णिमा गायकवाड ही महत्त्वकांक्षी राजकारणी महिलेची दमदार भूमिका  साकारल्यानंतर प्रिया-उमेश या लाडक्या जोडीची आणि काय हवं ह्या सुपरहिट वेबसिरीजचा ३ रा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आल्याने सर्वच चाहते खुश झाले. 

प्रिया सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. ती किती फिटनेस फ्रिक आहे, हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. वेळोवेळी तिच्या सोशल मिडीयावरुन याचा प्रत्यय येतो. वर्कआऊट करतानाचे विविध फोटो आणि धम्माल रील व्हिडीओ प्रिया नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करते. परंतु आज प्रियाने जीममधून केेलेला रील व्हिडीओ खुप खास आहे. कारण आज, लाडकी अभिनेत्री प्रिया बापटचा वाढदिवस आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

प्रियाच्या या कमाल धमाल बर्थ डे रील व्हिडीओवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. प्रार्थना बेहरे, आदित्य सरपोतदार, ऋतुजा बागवे, मुक्ता बर्वे आदींसह अनेकांनी प्रियाला शुभेच्छा दिल्या आहेत.  

Recommended

Loading...
Share