पाहा ‘परम सुंदरी’ सई ताम्हणकरचा हा घायाळ करणारा व्हिडीओ

By  
on  

मराठी सिनेसृष्टीची आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच आपल्या विविध लुक्समधून चाहत्यांना घायाळ करते. तिच्या प्रत्येक लुकला एक खास टच असतो. प्रसंगानुरुप तिचे आऊट्सफिट्स खास डिझाईन केलेले असतात. सोशल मिडीयावर तिचे विविध लुक्स पाहणं म्हणजे चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. 

आपल्या घायाळ करणा-या अदा आणि बिनधास्त-बेधडक अंदाजामुळे सईचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. सई सोशल मिडीयावर बरीच सक्रीय असते. नुकताच सईने तिचा एक खास लुकमधला स्लो-मोशन व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. यात सईला पाहून परम सुंदरीच अवतरल अस म्हणावं लागेल. 

चाहतेच नाही तर प्रार्थना बेहरे, जितेंद्र जोशी, अमृता खानविलकर, सारंग साठ्ये यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी तिच्यावर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. आत्तापर्यंत 96 हजारांहून अधिक लोकांनी सईचा हा व्हिडीओ पाहिला आहे. सर्वचजण तिचं प्रचंड कौतुक करत आहे. 

 

 

सईच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, मराठीचं नाही तर बॉलिवूडमध्येसुध्दा सई महत्त्वपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येतेय.

Recommended

Loading...
Share