बिग बॉस मराठी 3 : स्नेहा वाघ पूर्वाश्रमीच्या पतीसोबत एकाच छताखाली, घरगुती हिंसाचाराचे केले होते आरोप

By  
on  

मराठी मनोरंजनविश्वातील सर्वात मोठा रिएलिटी शो बिग बॉस मराठीचं तिसरं पर्व धुमधडाक्यात सुरु झालं आहे. यंदा अनेक प्रसिध्द चेहरे या कार्यक्रमातून आपले रंग दाखवणार आहेत. मीरा जगन्नाथ,  सोनाली पाटील, विशाल निकम, उत्कर्ष शिंदे यांसारखे एकाहून एक अवली कलाकार सदस्य म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. परंतु, यावेळेस आणखी एका कारणामुळे 'बिग बॉस मराठी ३' चर्चेत आहे. घरात एण्ट्री करणाऱ्या सदस्यांमधील दोन सदस्यांचं पूर्वीपासूनच नातं आहे. हे सदस्य कधीकाळी पती- पत्नी होते. त्यामुळे आता कार्यक्रमात खरा रंग चढणार आहे. 

हिंदी-मराठी टेलिव्हिजनवरील अभिनेत्री स्नेहा वाघ आणि मराठी सिनेमा, मालिकांमधला प्रसिध्द चेहरा अविष्कार दारव्हेकर यांचा घटस्फोट झाला आहे. परंतु यंदाच्या बिग बॉसच्या घराचे दोघंही सदस्य आहेत. त्यामुळे एकाच छताखाली हे कसे वावरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल 

महत्त्वाचं म्हणजे, स्नेहाने अविष्कारवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. एका मुलाखतीतमध्ये स्नेहा वाघने तिला घरगुती हिंसाचाराचा समाना करावा लागला असून तो काळ तिच्यासाठी खूपच कठीण असल्याचा खुलासा केला होता. “मला काय करावं ते कळत नव्हतं. या सर्वातून बाहेर कसं पडावं हे सूचत नव्हत. मी खूप वेदना सहन केल्या आहेत. अखेर माझ्या आई-वडिलांच्या आणि बहिणीच्या मदतीने मी यातून बाहेर पडू शकले. पतीच्या मारहाणीला बळी पडून त्यातून बाहेर पडू न शकणाऱ्या महिलांबद्दल मला खूप वाईट वाटतं.” असं म्हणत स्नेहाने तिच्यावर झालेल्या अन्यायाचा खुलासा केला होता.

Recommended

Loading...
Share