‘या’ मराठमोळ्या हास्यसम्राटाचे चक्क बिग बींनी धरले पाय

By  
on  

छोट्या पडद्यावरचा ससर्वात लोकप्रिय शो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा. हा कॉमेडी शो आपल्याला सर्व टेन्शन विसरायला लावतो. हा शो संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवतो. यातील प्रत्येक विनोदवीर प्रेक्षकांचं खुप मनोरंजन करतो. या कार्यक्रमातील सर्व कलाकारांनी नुकतीच बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांचा शो ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये हजेरी लावली. दरम्यान ते विनोदाचा बादशाह समीर चौघुले समोर आदराने झुकले आहेत. त्यांच्या भेटीचा हा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला असून चर्चेत आहे.

 

‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर गेल्यावर समीर चौघुले अमिताभ बच्चन यांच्याशी बोलायला गेले. तेव्हा समीर बिग बींना म्हणाले की मला तुमच्या पाया पडायचे आहे. ‘तुम्ही नका माझ्या पाया पडू, मी तुमच्या पडतो’ असे अमिताभ म्हणाले. सध्या सोशल मीडियावर अमिताभ बच्चन आणि समीर चौघुले यांच्या भेटीचा फोटो तुफान व्हायरल होतोय.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by

Recommended

Loading...
© Copyright Clapping Hands Private Limited. About Us | SITEMAP