सायली आणि निलांबरीसाठी झालीय 'बडी मुश्किल', हा Video पाहा

By  
on  

ती परत आलीय ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय हॉरर-थ्रीलर मालिका. या मालिकेने अल्पावधितच आपला मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. वेबसिरीज फॉरमॅटमध्ये असलेली ही मालिका खुप पसंतीस उतरतेय. दररोज येणारी उत्कंठावर्धक वळणं पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. निर्जन रिसॉर्टवर अडकलेल्या ९-१० मित्र मैत्रिणींच्या ग्रुपची ही गोष्ट आहे. त्यामुळे सर्वच तरुण कलाकार मालिकेत पाहायला मिळतायत. 

मालिकेतील कलाकारांची ऑफ-स्क्रीन खुप धम्माल सुरु असते. अलिकडेच मालिकेत कॉलेजच्या साडी डेच्या दिवसातला सीन चित्रित करण्यात आला होता. तेव्हा सायली आणि निलांबरीने झक्कास साड्या नेसल्या होत्या. दोघीही खुप सुंदर दिसत होत्या. सायली साकारणारी अभिनेत्री कुंजिका काळवीट आणि निलांबरीच्या भूमिकेतील अभिनेत्री अनुष्का जुन्नरकर यांनी माधुरीच्या बडी मुश्कील या गाण्यावर जबरदस्त ताल धरलाय. या दोघींचा हा रील व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. 

Recommended

Loading...
Share