अमृता खानविलकर 'अमृत कला'च्या माध्यमातून विविध नृत्याविष्कार समोर घेऊन येते आहे. लहानपणापासूनच नृत्याची आवड असलेल्या अमृताची उत्तम नृत्यांगना म्हणूनही ओळख आहे. याच नृत्यप्रेमाचं रुपातंर करत 'अमृत कला'च्या माध्यमातून अमृता नृत्य सादरीकरण करतेय.
यावेळच्या तिच्या व्हिडियोमध्ये सोबत आहे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे. मृण्मयीही उत्तम नृत्यांगना आहे. या दोघीही ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमातील प्रसिद्ध गाणं ‘सुर निरागस हो’ यावर या दोघीही थिरकताना दिसत आहेत. सूर निरागस हो.. उमा आणि झरीना ७ वर्षानंतर पुन्हा एकत्र येतात! हे कॅप्शन देत मृण्मयीने हा व्हिडियो शेअर केला आहे. व्हाईट अनारकली आणि सुरेख पदन्यास असलेला हा व्हिडियो प्रेक्षकांना आवडतो आहे.