डॉ. अजित फेम किरण गायकवाड होणार ‘छूमंतर’, पाहा फोटो

By  
on  

मागील काही दिवसात देवमाणूस मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. दहा जणांचे खून करणारा देवी सिंग उर्फ अजित कुमार देवचा चंदा खून करते आणि हे डिंपल बघते व डिंपल चंदाचा खून करते, असं दाखविण्यात आलं असलं तरी शेवटी मात्र हॉस्पिटलमध्ये पुन्हा जिंवत झालेला देवी सिंग पाहून देवमाणूसचा सिक्वल येणार अशी चर्चा सुरु आहे. 

 

 

पण या दरम्यानच हटके फोटो समोर आले आहेत. यामध्ये एका फॅन पेजकडून किरणच्या आगामी प्रोजेक्टच्या क्लॅपसोबतचा फोटो शेअर केला आहे. ‘छूमंतर’ असं त्याच्या आगामी प्रोजेक्टचं नाव आहे. आता या प्रोजेक्टचा जॉनर कोणता आहे हे समोर आलं नाही. पण यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

Recommended

Loading...
Share