By  
on  

''पुढचा जन्म रस्ते कॅान्ट्रॅक्टरचा मिळू दे”, हेमंत ढोमेची भन्नाट पोस्ट

पावसाळा आणि रस्त्यावरचे खड्डे यांचं जन्मोज्नमीचं नातंच जणू. प्रत्येकाला प्रवासात यांचा छान लाभ मिळतो. खड्ड्यामुळे  बऱ्याच वेळा अपघात होतात. अपघाताचे प्रमाणे वाढल्याने स्थानिक लोक प्रशासनावर नाव ठेवत असतात. मात्र, अभिनेता हेमंत ढोमेने प्रशासनावर नाही तर कॅान्ट्रॅक्टर लोकांना सोशल मिडीया पोस्टच्या माध्यमातून चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. 

रस्त्यावर असलेल्या खड्यांचा फोटो हेमंत ट्विट करत म्हणतो,  ‘अतिशय प्रामाणिकपणे सांगतो… पंतप्रधान, मुख्यमंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक सग्गळे नंतर! खरे ‘कॅान्ट्रॅक्टर’! रस्ते बनवण्यात जी हातसफाई त्यांना जमते ना, कमाल! त्यांना कोणी बदलू शकत नाही!ते भारी आहेत! सगळ्यांना रस्त्याला लावतात! पुढचा जन्म रस्ते कॅान्ट्रॅक्टर चा मिळुदे बाबा!’

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive