'आई कुठे काय करते' मालिकेतील या अभिनेत्रीने सुरु केला हा व्यवसाय

By  
on  

आई कुठे काय करते ही छोट्या पडद्यावरची सर्वाधिक लोकप्रिय मालिका. ह्या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतायत. या मालिकेत सर्वांच्याच अभिनयाचं प्रचंड कौतुक केलं जातं. मालिकेत अरुंधती या नायिकेच्या पडत्या काळात सतत तिच्या पाठीशी उभी राहणारी तिच्या जिवा-भावाची मैत्रिण देविका तुम्हाला सर्वांनाच माहितीय. हीच देविका म्हणजे अभिनेत्री राधिका देशपांडे हिने एका नव्या व्यवसायाची नुकतीच सुरुवात केली आहे. 

राधिकाने ‘राधिका क्रिएशन’ या नावाची नवीन एक्टिंग स्कूल सुरू केली आहे. या शाळेच्या माध्यमातून लहानमुलांना अभिनयाचे प्रशिक्षण देण्यात येईल. तसंच या मुलांना घेऊन नाटकाचे काही प्रयोग देखील सादर केले जातील. राधिका ब-याच काळापासून लहान मुलांमधील अभिनयाच्या कलागुणांना वाव देण्याचं काम करतेय. तिच्या या एक्टिंग स्कूल संदर्भात तिनेच सोशल मिडीयावरुन ही माहिती दिली. 

राधिकाला तिच्या देविकाच्या भूमिकेसाठी प्रेक्षकांनी खुप कौतुक केले. अभिनयासोबतच ती एक उत्तम लेखिका आणि दिग्दर्शक देखील आहे. ‘होणार सून मी या घरची’, ‘स्वराज रक्षक संभाजी’, ‘लक्ष्य’ सारख्या अनेक मालिकेत तिने भूमिका साकारल्या आहेत. 

Recommended

Loading...
Share