शरीरावर नको त्या ठिकाणी टॅटू गोंदवल्याने ही मराठी अभिनेत्री झाली ट्रोल

By  
on  

सोशल  मिडीयावर सध्या सेलिब्रिटींना ट्रोल करण्याचं प्रमाण वाढलंय. एखाद्या गोष्टीवर प्रत्येक नेटकरी आपलं मत मांडतोय. किंवा मग एखाद्या गोष्टीवर ती कशी वाईट आहे, याबद्दल प्रतिक्रीया देतोय. आता हेच बघा ना, मराठी सिनेविश्वातील अभिनेत्री भाग्यश्री मोटेला तिने शेअर केलेल्या एका फोटोमुळेट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. 

भाग्यश्री सोशल मिडीयावर खुप सक्रीय असते. नेहमीच आपले फोटोशूट, ट्रॅव्हलिंग आणि इतर अनेक अपडेट्स ती चाहत्यांशी शेअर करते. अलिकडेच भाग्यश्रीने तिच्या शरीरावर टॅटू गोंदवून घेतला आणि तो फोटो पोस्ट केला. पण हा फोटो पाहताच अनेक ट्रोलर्सनी तिच्यावर निशाणा साधलाय. 

स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार, हा तर धर्माचा अपमान, महामृत्युंजय मंत्र गोंदवून घ्यायला लाज वाटली पाहिजे अशा प्रकारच्या नाना प्रतिक्रीया भाग्यश्रीच्या या फोटला आल्या आहेत. 

 

मराठी आणि हिंदीसह दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतही काम करणारी भाग्यश्री बिनधास्त आहे. ती नेहमीच तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते

Recommended

Loading...
Share