By  
on  

प्रिया बेर्डे यांच्यावर या कारणासाठी होतो आहे शुभेच्छांचा वर्षाव

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचे अनेक फॅन्स आहेत. लक्ष्मीकांत बेर्डेसोबतच्या त्यांच्या केमिस्ट्रीला रसिकांचीही पसंती मिळाली. प्रिया बेर्डे हॉटेल व्यवसायातही आहेत. पुण्यातील बावधन परिसरात त्यांचं हॉटेल आहे. या हॉंटेलला अनेक कलाकारही भेट देत असतात. कोल्हापुरच्या असलेल्या प्रिया यांनी कोल्हापुरची खास चव या हॉटेलच्या निमित्ताने समोर आणली आहे. 

 

पण आता प्रिया यांनी आणखी एक हॉटेल सुरु केलं आहे. पुण्यातील पौड रोडवर त्यांनी ‘चख ले’ ची दुसरी शाखा सुरु केली आहे. या निमित्ताने सोशल मिडियावर चाहते त्यांचं अभिनंदन करत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive