अभिनेते भरत जाधव यांच्या नावाखाली पैसे उकळण्याचा प्रकार आला समोर

By  
on  

फसवणुकीच्या अनेक बातम्या समोर येताना दिसतात. अभिनेते भरत जाधव यांनीही एक घटना शेअर केली आहे. भरत यांच्या नावाखाली पैसे मागण्याचा प्रकार समोर आला आहे. भरत यांच्या सिनेमात काम मिळवून देऊन फोटोशुटसाठी जवळपास 15000 हजार रुपयांची मागणी केली गेली. भरत यांनी नुकतीच याबाबत पोस्ट शेअर केली आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

 

आपल्या पोस्टमध्ये भरत म्हणतात, ‘काल एका व्यक्ती चा मेसेज आला की "तुमच्या सिनेमात काम करण्यासाठी मुंबईतील एका एजंटने आमची ऑडिशन घेतली व सिलेक्शन झाले असून फोटोशूट व पुढील प्रोसेसिंग फी च्या नावाखाली १५०००/- रुपयांची मागणी केली."मी सर्वांना सांगू इच्छितो की माझ्या कोणत्याही सिनेमाचं असं कुठेही ऑडिशन सुरू नाहीए.

जर कोणी माझ्या नावाचा गैरवापर करून किंवा माझ्या सोबतचा एखादा फोटो दाखवून सिनेमात काम मिळवून देतो असे आश्वासन देत असेल तर अशा भूलथापांना बळी पडू नका. कोणालाही पैसे देऊ नका. संबंधित व्यक्तींवर लवकरच योग्य ती कायदेशीर कारवाई होईल.’

Recommended

Loading...
Share