बिग बॉस मराठीचा यंदाचा तिसरा सीझन आणखी खुमासदार आणि रंगतार होणार आहे, यात शंका नाही. कारण पहिला आठवडा बराच गाजला आहे. यंदा वीकेंडला बिग बॉसची चावडी असते. सर्वांचे लाडके होस्ट महेश मांजरेकर या चावडीवर स्पर्धकांची शाळा घेतात. मात्र, या वेळी शोचे सुत्रसंचालन करणारे अभिनेते महेश मांजरेकर चर्चेत आले आहेत. सध्या बिग बॉसच्या चावडीचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी महेश मांजरेकर यांची तुलना ही नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याशी केली आहे. त्यांच्यामते, दोघंही एकदम सेम टू सेम दिसतायत.
या प्रोमोत महेश मांजरेकर हे स्पर्धक मीरा जगन्नाथची चांगलीच शाळा घेताना दिसले. ते तिची खरडपट्टी काढतायत.
हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी महेश यांची तुलना छगन भुजबळ यांच्याशी केली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, “मला वाटलं भुजबळ च आहे की काय.” दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मला वाटलं छगन भुजबळ इकडे कसे काय.” तिसरा नेटकरी म्हणाला, “Same to same छगन भुजबळ साहेब.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “आम्ही तर भुजबळ साहेबांना बघायला आलो.” दुसरा नेटकरी म्हणाला, “मला वाटलं भुजबळ च आहे की काय.” तिसरा नेटकरी म्हणाला, “मला वाटले छगन भुजबळच आलेत होस्ट म्हणून!” अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी महेश यांची तुलना छगन भुजबळ यांच्याशी केली आहे.