Cuteness Overloaded ! परी आणि आईचे हे गोड फोटो तुम्हाला खुप आवडतील

By  
on  

माझी तुझी रेशीमगाठ ही झी मराठीवरील मालिका अल्पावधितच लोकप्रिय झालीय. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या खुप पसंतीस उतरतेय.पण भाव खाऊन जातेय ती गोड परीच्या भूमिकेतील बालकलाकार मायरा.

 

नुकत्याच झालेल्या डॉटर्स डेच्या निमित्ताने परी आणि आईने खास फोटोशूट केलं

 

मायलेकींचा हा गोड अंदाज सोशल मिडीयावर बराच व्हायरल झाला आहे. 

जीन्स आणि टीशर्टमधला परी व नेहाचा लुक लय भारी दिसतोय.

मालिकेत परी आणि नेहाचा एक फेमस डॉयलॉग आहे 'अपने पास बहोत पैसा है' 

 

हाच डॉयलॉग त्यांच्या टीशर्टवर आहे. त्यामुळे त्यांचा एक स्वॅग पाहायला मिळतोय. 

ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन नेहा आणि परीचं खुप छान बॉंडींग पाहायल मिळतं. 

मालिकेतील या मायलेकींच्या जोडीवर प्रेक्षक नेहमीच भरभरुन कौतुक करतात. 

सोशल मिडीयावर हे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

 

परी फेम बालकलाकार मायराच्या गोड अंदाजाच्या प्रेमात प्रेक्षक आहेत. 

Recommended

Loading...
Share