‘ तू सौभाग्यवती हो’ मालिकेने घेतला निरोप सुर्यभान साकारणा-या हरिष दुधाडेची खास पोस्ट

By  
on  

नशिबाच्या वेगळ्या खेळीने एकत्र आलेल्या ऐश्वर्या आणि सुर्यभानच्या आंबट गोड नात्याची गोष्ट ‘तू सौभाग्यवती हो’ मालिकेत दिसली. या मालिकेने नुकताच निरोप घेतला आहे. खरंतर दोन महिन्यापुर्वीच मालिकेने मालिकेने शंभर भागांचा टप्पा गाठला होता. इतक्या लवकर या मालिकेने निरोप घेतल्याने प्रेक्षक काहीसे नाराजही झाले आहेत.

 

 

पण या दरम्यान सुर्यभानच्या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. सुर्यभान फेम हरिष दुधाडे आपल्या पोस्टमध्ये म्हणतो. नमस्कार , भरलेल्या अंत:करणाने आणि भारलेली कलाकृती तुम्हा रसीकप्रेक्षकांच्या चरणी समर्पित करत , मी सुर्यभान तुमचा निरोप घेतो . तुम्ही केलेलं हे प्रेम मनाच्या सगळ्यात वरच्या कप्प्यात अत्तराच्या सुगंधीत कुपी सारखं कायम जवळ राहील. माझ्यासोबत तुम्ही हसलात रडलात , माझ्यावर चिडलात पण तरीही माझ्यातच रमलात , तुमच्या या निस्वार्थ सोबतीला नमन करतो ....... आज निरोप घेत असलो तरी आपली साथ अशीच कायम राहील ... विषय कट ..

- सुर्यभानराव जाधव’ 
हरिष आगामी पावनखिंड या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

Recommended

Loading...
Share