सैराटची आर्ची म्हणून रिंकू राजगुरु महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या कानाकोप-यात पोहचली. अभिनेत्री रिंकू राजगुरुचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी रिंकू तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. रिंकूने नुकताच तिच्या नजाकत आणि अदाकारीने सजलेले छानसे फोटो पोस्ट केले आहेत.
सैराटनंतर रिंकूने आपल्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेतलीय.
पूर्वी रिंकूला व्यायामाचा कंटाळा यायचा पण आता रिंकू नियमित व्यायाम करत स्वत:ला फिट ठेवते.
रिंकू वयाने जरी लहान असली तरी अभिनयासोबतच फिटनेसमध्येसुध्दा अभिनेत्रींना ती टक्कर देतेय;
मराठीसोबतच रिंकू ही हिंदीतही दिमाखात झळकतेय.