भरत जाधव महेश कोठारेंना म्हणतात, ‘लक्ष्यामामांच्या शब्दाखातर तुम्ही माझ्यासाठी थांबलात ही मोठी गोष्ट आहे’

By  
on  

आज अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त मराठी सिनेसृष्टीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसतो आहे. अभिनेता भरत जाधव यांनीही खास आठवण शेअर करत महेश यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भरत जाधव यांनी महेश यांच्या पछडलेला सिनेमात काम केलं होतं.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

 

आपल्या पोस्टमध्ये भरत म्हणतात, ‘आदरणीय महेश कोठारे सर, वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा..! पछाडलेला सारखा अफलातून चित्रपट तुम्ही मला दिलात. खरं तर तो चित्रपट नाटकाच्या दौऱ्यांमध्ये व्यस्त असल्यामुळे मी नाकारला होता पण लक्ष्या मामांच्या शब्दा खातर आणि माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही माझ्यासाठी थांबलात ही माझ्यासाठी खुप मोठी गोष्ट आहे.’

Recommended

Loading...
Share