अलीकडे संपुर्ण राज्यात पाऊस हजेरी लावताना दिसून येतो आहे. अनेकांना या पावसाचा फटका बसतो आहे. पण श्रुती मराठेची मात्र पावसाने वाईट अवस्था केली आहे. श्रुतीने एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये श्रुतीच्या आईने रुमभर कपडे सुकवण्यासाठी पसरवले आहेत.
या व्हिडियोमध्ये श्रुती म्हणते, ‘ आज दिवसभर काम होतं मला. मी आताच घरी आले. पुण्यात आज पाऊस पडला तर माझ्या रुमची काय हालत झाली आहे बघा’. यावेळी रुमकडे कॅमेरा केल्यानंतर रुममध्ये सर्वत्र सगळीकडे कपडे वाळत घातलेले दिसतात. यावर ती आईला विचारते, ‘ आई मी कुठे झोपायचं’ तिचा हा धमाल व्हिडियो पाहून चाहतेही त्यांच्या घरातील किस्से कमेंटमध्ये शेअर करत आहेत.