By  
on  

अभिनेत्री स्मिता शेवाळेने चाहत्यांशी शेअर केलं खास व्यक्तिरेखेबाबत

अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री म्हणजे स्मिता शेवाळे. स्मिता अलीकडेच स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत दिसली होती. आता ती ज्ञानेश्वर माऊली या मालिकेत दिसणार आहे. याबाबत स्मिताने पोस्ट शेअर करत सांगितलं आहे.

 

 

स्मिता आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हणते, ‘ज्ञानेश्वर माऊली' या सीरियल मध्ये ज्ञानेश्वर माऊली याच्या आईची भुमिका करण्याचं भाग्य मिळालं आहे... पांडुरंगाचे आशीर्वाद आणि तुमचं प्रेम सदैव बरसत राहू देत.. आज पर्यंत तुमच्यामुळे या क्षेत्रातला अवघड प्रवास कधीही त्रासदायक वाटला नाही.. तुमच्या प्रेमामुळेच नवनवीन भूमिकेचं आव्हान पेलण्याची ताकद आली.. यापुढेही अशीच साथ द्याल अशी आशा आहे.’

Author

Recommended

PeepingMoon Exclusive