वैदेही मालिकेतून सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री पल्लवी पाटील सोशल मिडियावर अॅक्टीव्ह असते. रुंजी मालिकेतील तिच्या भूमिकेने प्रेक्षकांचं मन वेधून घेतलं आहे. पण सध्या पल्लवी तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. आताही तिने बोल्ड फोटो शेअर केले आहेत. पण एका फोटोच्या कॅप्शनने मात्र चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
यामध्ये ब्लॅक आणि व्हाईट ब्लेजर घातलं आहे. डीप नेक टॉपसोबत हे लूक कॅरी केला आहे. या कॅप्शनमध्ये ती म्हणते, आधीच जाहीर करते, प्रसिध्दी मिळवण्यासाठी हा फोटो आहे. कष्ट नको फार. बाकी प्रेम आहेच.’ चाहते तिच्या या लूक्स आणि कॅप्शनचं कौतुक करत आहेत.