By  
on  

टॅटू काढताना दुखलं नाही का..... म्हणत नेटिझन्सनी केलं मिताली मयेकरला ट्रोल

अभिनेत्री मिताली मयेकर तिच्या लूक्समुळे कायमच चर्चेत असते. मिताली चाहत्यांशी अनेकदा हटके फोटोशूट मधून चाहत्यांच्या भेटीला येत असते. पण सध्या मिताली ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. मितालीने नुकताच एक व्हिडियो शेअर केला आहे. मितालीने काही दिवसांपूर्वी तिचे पहिले व्हॅक्सिनेशन घेतले. त्यावेळचा एक व्हिडिओ तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.  

 

 

इंजेक्शन घेताना मितालीची चांगलीच घाबरगुंडी उडाल्याचे दिसत आहे. इंजेक्शन देणारी नर्स तिला घाबरू नको असं वारंवार सांगते, पण मितालीची भीती काही कमी होताना दिसत नाही. मिताली हाताने डोळे झाकून घेताना दिसते. त्याचवेळी मितालीच्या हातावर टॅटूही दिसत आहे.  यामुळे ती ट्रोल झाली आहे. एक युजर म्हणते, ‘खुपच जास्त ओव्हर अ‍ॅक्टींग.’ तर एका युजर म्हणतो, ‘टॅटू काढताना तू घाबरली नाहीस, परंतु व्हॅक्सिन घेताना घाबरली.’

Author

Recommended

PeepingMoon Exclusive