Photo : प्रसिध्द अभिनेत्री मानसी नाईककडे आहे गुड न्यूज?

By  
on  

लॉकडाऊन काळात अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले. प्रसिध्द नृत्यांगना आणि अभिनेत्री मानसी नाईक हीसुध्दा आपला फियान्से प्रदीप खरेरासोबत बोहल्यावर चढली. मॉडेल आणि इंटरनॅशनल बॉक्सर असलेला मानसीचा पती प्रदीप सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतो. हे ब्युटिफुल कपल चाहत्यांना नेहमीच कपल गोल्स देतात. विविध धम्माल व्हिडीओज् आणि फोटोशूट ते सतत चाहत्यांशी शेअर करतात. 

परंतु नुकतंच मानसीने आपला बेबी बंप शेअर केल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. मानसीने फार लवकरच गुड न्यूज देण्याची तयारी केलीय याची त्यांना कल्पना नसावी. यात साडी नेसलेली मानसी बेबी बंप फ्लऑण्ट करत लाजतेय आणि चॉकलेटही हातात धरलंय.

 

 

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये मानसीने कमिंग सून म्हटलंय. त्यामुळे नक्की बाळ येतंय की एखाद्या व्हिडीओ सॉंगची प्रसिध्दी हे लवकरच कळेल. बॉलिवूडची प्रसिध्द गायिका नेहा कक्कर हिनेसुध्दा एका गाण्याची अशीच प्रसिध्दी केली होती. 

Recommended

Loading...
Share