अभिनेत्री रसिका सुनील आणि बॉयफ्रेंड आदित्य बिलागी सोशल मिडियावर फोटो आणि व्हिडियोच्या माध्यमातून चर्चेत असतात. या वर्षाच्या सुरुवातीला रसिकाने आदित्य बिलागीला डेट करत असल्याचं शेअर केलं होतं. काही वर्षांपूर्वी रसिका ही शिक्षणासाठी परदेशात गेली होती. तिथेच तिची भेट आदित्यसोबत झाली होती. त्यानंतर दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
पण आता ही जोडी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. रसिका एक फोटो शेअर केला आहे. त्यात तिचा पेट डॉग रशने एक बोर्ड पकडला आहे. My humans are getting married असं त्या बोर्डवर लिहलं आहे. ‘हे ऑफिशिअल बनवण्यासाठी खुप उत्सुक आहे.’ असं कॅप्शन देत आदित्य बिलागीने हा फोटो शेअर केला आहे.