By  
on  

या दिवशी ‘डार्लिंग’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला, वाचा सविस्तर

थिएटर सुरु होणार असल्याच्या बातमीने अनेक सिनेमांच्या रिलीज डेट समोर येताना दिसत आहेत. डार्लिंग सिनेमा 10 डिसेंबर 2021 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.  यात समीर आशा पाटील दिग्दर्शित डार्लिग सिनेमाची गाणी अलिकडेच रसिकांच्या भेटीला आली होती. त्याला खुप चांगला प्रतिसाद मिळाला. आता सर्वांनाच या रोमॅण्टिक कॉमेडी सिनेमाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागली आहे. 

 

 

डार्लिंग सिनेमात प्रथमेश परब आणि निखिल चव्हाण दिसणार आहेत. ‘टकाटक’ या सुपरहिट मराठी सिनेमात दमदार भूमिका साकारलेली रितिका श्रोत्रीच्या 'डार्लिंग’ या आगामी सिनेमातही झळकणार आहे. ‘मनोरंजनाची परंपरा अविरत चालू ठेवूया. रसिक मायबाप प्रेक्षकहो, भेटूया १० डिसेंबरला फक्त चित्रपटगृहात. आशीर्वाद असू द्या.’ हे कॅप्शन देत निखिल चव्हाणने डार्लिंगच्या रिलीजची डेट शेअर केली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive