By  
on  

महेश मांजरेकर यांनी केली आगामी सिनेमाची घोषणा, ‘गोडसे’ हे आहे सिनेमाचं नाव

काल गांधी जयंतीचं औचित्य साधात अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आगामी सिनेमाची घोषणा केली. महेश मांजरेकर यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेवर चित्रपट करत असल्याचं जाहीर केलं आहे. महात्मा गांधींच्या १५२ व्या जयंती दिवशी महेश मांजरेकर यांनी इन्स्टाग्रामला सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. 

 

 

नथुराम गोडसेची गोष्ट नेहमीच माझ्या जवळ राहिली आहे. अशा पद्धतीच्या सिनेमाला हात घालताना खूप धाडस लागतं. मी नेहमीच कठीण विषय आणि गोष्ट सांगताना तडजोड करण्याच्या विरोधात आहे. गोडसेबाबत महात्मा गांधींचा मारेकरी याव्यतिरिक्त जास्त माहिती नाहीये. ही गोष्ट सांगताना आम्हाला कोणाचीही बाजू मांडायची नाहीये किंवा विरोधात बोलायचं नाहीये. कोण चूक कोण बरोबर हा निर्णय आम्ही प्रेक्षकांवर सोडणार आहोत.’ हे कॅप्शन देत महेश यांनी सिनेमाविषयीची भूमिका मांडली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive