प्रसिध्द अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महोश वामन मांजरेकर यांनी 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या मुहूर्तावर आपल्या आगामी सिनेमाचा टीझर प्रदर्शित केला. गोडसे असं त्यांच्या आगामी सिनेमाचं नाव आहे, यामुळे तमाम मराठी प्रेक्षकांसाठी हा एक आश्चर्यकारक धक्का होता. तमाम चाहत्यांसह सेलिब्रिटी वर्तुळातून महेश मांजरेकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. मात्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मांजरेकरांच्या चित्रपटाचा हा विषय फारसा पसंत पडलेला दिसत नाही. 'गोडसे' चित्रपटावरून आता नवा वाद उभा ठाकला आहे. आव्हाड यांनी ट्विट करत चित्रपटावर आक्षेप घेतला असून मांजरेकरांवर टीकेची झोड उठववली आहे.
Who is Mahesh Manjrekar … wat is his contribution to Indian Cinema….to seek attention such dramas are needed pic.twitter.com/nf2S1l2CAE
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 2, 2021
महेश मांजरेकर आपल्या पोस्टमध्ये लिहतात, 'यापूर्वी कुणीही जे सांगण्याचं धाडस केलं नाही ते ऐकण्यासाठी सज्ज व्हा. नथूराम गोडसे यांची ही कथा माझ्या हृदयाच्या फार जवळ आहे. अशा चित्रपटांना पाठिंबा देण्यासाठी खूप हिंम्मत लागते. कठीण विषय आणि बिनधास्त गोष्टींवर माझा नेहमीच विश्वास आहे. महात्मा गांधींवर गोळी झाडणारा एक माणूस या व्यतिरिक्त कुणालाही गोडसेंबद्दल माहिती नाही. योग्य काय आणि अयोग्य काय हे प्रेक्षकांवर सोडलेलं आहे.'