By  
on  

लव्हबर्डस् शिव-वीणा यांच्या ब्रेकअपची रंगलीय चर्चा, वीणाने हटवलाय टॅटू

सध्या बिग बॉस मराठी ३ च्या पर्वाची चांगलीच चर्चा रंगलीय. दरम्यान दुस-या पर्वातील विजेता शीव ठाकरे आणि त्याची त्याच पर्वातील प्रेयसी म्हणजेच अभिनेत्री वीणा जगताप या लव्हबर्ड्सच्या ब्रेक-अपचीसुध्दा सोशल मिडीयावर चर्चा आहे. बिग बॉस मराठीचा दुसरा सीझन संपल्यानंतरसुध्दा अनेकदा दोघंही एकत्र स्पॉट व्हायचे. एकमेकांसोबतचे सुंदर  फोटो शेअर करत कपल गोल्स द्यायचे. 

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री वीणा जगताप आणि अभिनेत्री अक्षया देवधर या दोघी लडाख ट्रीपवर गेल्या होत्या. तेव्हा तिथले विविध फोटोशूट आणि रील व्हिडीओचा नजराणा त्यांनी चाहत्यांसमोर सादर केला.

पण यात वीणाच्या एका व्हिडीओतून चाहत्यांना प्रचंड आश्चर्याचा धक्का बसलाय. तो म्हणजे, वीणाने आपल्या हातावर काढलेला शीवच्या नावाचा टॅटू मोडीफाई केलाय. त्यावर तिने आता एका झाडाच्या पानाचा आकार गोंदवून घेतलाय.

पण दोघांकडूनही तशी कुठलीच अधिकृत स्टेटमेंट आलेले नाही, तर त्यांच्या इन्स्टाग्रामवरसुधदा एकमेकांसोबतचे फोटो कायम आहेत.

 

दरम्यान शीवच्या हातावरचा वीणाच्या नावाचा टॅटू अद्याप कायम असल्याचं सोशल मिडीयावरुन समजतंय

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive