By  
on  

“टुकार मालिका कशा बंद होतील?”, यावर प्रशांत दामलेंचं भन्नाट उत्तर

अभिनेते प्रशांत दामले  हे कलाकार म्हणून जितके लोकप्रिय आहेत, तितकेच ते माणूस म्हणूनही असंख्य चाहत्यांना भावतात. अनेकदा अडचणीच्या काळात ते गरजूंच्या मदतीला धावून येतात, हे आपण सर्वांनीच अनुभवलंय. प्रशांत हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकतीच प्रशांत यांनी एक पोस्ट शेअर केली. मात्र, या पोस्टवर एका नेटकऱ्याने केलेल्या कमेंटने प्रशांत यांचे लक्ष वेधले आहे. या नेटकऱ्याने “टुकार मालिका कशा बंद होतील?” असा सवाल प्रशांत यांना केला. त्यावर त्यांनी दिलेले उत्तर हे सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

प्रशांत यांनी आपल्या फेसबुकवरुन नाट्य कार्यशाळेबद्दलची सविस्तर माहिती व्हिडीओसहित दिली होती. 

 

 

 

त्यांची ही पोस्ट पाहिल्यानंतर एक नेटकरी म्हणाला, “टुकार मराठी मालिका कशा बंद होतील? ते सांगा.” नेटकऱ्याच्या या कमेंटने प्रशांत यांचे लक्ष वेधले आणि ते मजेशीर उत्तर देत म्हणाले, “बघण बंद केलं की,” ही कमेंट करत प्रशांत यांनी हसण्याचे इमोजी देखील वापरले आहे. प्रशांच यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive