By  
on  

या दोन फिटनेस फ्रीक अभिनेत्रींमध्ये आहे खास नातं

अभिनेत्री सोनाली खरे युट्युबच्या माध्यमातून फिटनेसशी रिलेट गोष्टी शेअर करत असते. फिटनेसबाबत ती एक शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. खरे बोल असं तिच्या या शो चं नाव आहे. युट्युब चॅनेलवरुन तिचा हा शो प्रसारित होतो आहे.  यावेळी तिच्या शोमध्ये खास पाहुणी आली होती. शालिनी फेम अभिनेत्री माधवी निमकर या शोमध्ये दिसली होती. 

 

 

माधवीने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती आणि सोनाली योगा करताना दिसते आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये माधवी म्हणते, ‘ मी माझ्या सुंदर बहिणीसोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करते आहे.’ यामध्ये दोघींनीही योगाच्या काही पोझेसही शेअर केल्या आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive