आज शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. येत्या नऊ दिवसात उत्साहाची उधळण करणा-या नवरात्रीचा माहोल आता कुठे सजू लागला आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आज पिवळ्या रंगाचा मान आहे. माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील परी म्हणजेच मायरा वैकूळनेही अतिशय गोड अंदाजात नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी पिवळ्या पंजाबी ड्रेसमध्ये मायरा खुपच क्युट दिसते आहे. मालिकेतही श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या दिग्गज कलाकारांसोबतच परीने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. निखळ आणि मस्तीखोर स्वभावामुळे तिची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. प्रेक्षकांनाही तिचा हा निरागस अंदाज पसंत पडत आहे.