आपल्या मादक सौंदर्यांने आणि अप्रतिम अभिनयाने चाहत्यांना भुरळ पाडणारी मराठी सिनेसृष्टीची अप्सरा सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पती कुणाल बेनोडेकरसह मालदि्व्स् या जगातल्या सर्वात नयनरम्य ठिकाणी सुट्ट्यांचा आनंद घ्यायला गेली होती, तिथे विविध फोटोशूट करत तिने चाहत्यांसाठी एक खास पर्वणीच दिली. पण आत्ता मात्र सोनालीने तिथलेच काही बोल्ड आणि ब्युटिफुल असे थ्रोबॅक फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मालदि्व्सच्या किना-यावरचे आणि पूलमधले सोनालीने अनेक फोटो आत्तापर्यंत शेअर केले आहेत. पण तरीही अनेक सुंदर व आत्तापर्यंत न पाहिलेले फोटो अजून ती पोस्ट करतेय.
सोनाली आणि तिचे पती कुणाल या दोघांनाही भटकंतीची प्रचंड आवड आहे. व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत ते नवनवीन ठिकाणांना नेहमीच भेट देतात.
सोनालीच्या या थ्रोबॅक फोटोसिरीजवर चाहते कौतुकाचा वर्षाव करतायत. लाल रंगाच्या बिकीनी ड्रेसमधील सोनालीवर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत.