By  
on  

नवरात्रीच्या उत्सवाच्या चौथ्या दिवशी अपुर्वा नेमळेकर दिसली जगदंबा मातेच्या रुपात

आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे. आजच्या दिवशी केशरी रंगाचा मान आहे. शेवंता फेम अभिनेत्री अपुर्वा नेमळेकरही देवीच्या नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर आली आहे. चौथ्या दिवशी अपुर्वा नेमळेकर जगदंबा मातेच्या रुपात दिसते आहे. आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अपुर्वा म्हणते, ‘नवरात्रीचा चौथा दिवस!

 

 

रंग - नारींगी
देवी- जगदंबा माता - राशिन
.जगदंबा माता (राशीनची देवी) मंदिर, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन या ठिकाणी आहे. देवी यमाई या नावानेही प्रसिद्ध आहे मंदिराची रचना हेमाडपंती आहे. या मंदिराच बांधकाम शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. हलती दीपमाला हे या मंदिराच खास वैशिष्टय़ आहे. मी अणि माझ्या टीमने केलेला एक प्रामाणिक प्रयत्न. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!’  देवीच्या या सात्विक रुपात दिसत असलेल्या अपुर्वाचं चाहते कौतुक करत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive