By  
on  

टपाल टिकीटावर झळकणार वैभव मांगले आणि राहुल भंडारे

‘अलबत्या-गलबत्या’ या नाटकाने लहान-मोठ्यांवर जादू केली.  नाट्यक्षेत्रात विश्वविक्रम घडवणाऱ्या ‘अलबत्या-गलबत्या’ या बालनाट्याची दखल भारतीय टपाल विभागाने घेतली आहे. जागतिक टपालदिनी या नाटकात चिंची चेटकिणीच्या भूमिकेतील सुप्रसिध्द अभिनेते वैभव मांगले आणि प्रयोगशील निर्माते राहुल भंडारे यांचे छायाचित्र असलेले टपाल तिकीट जाहीर करून त्यांचा सन्मान केला आहे.

भारतीय डाक विभागाच्या मुंबई पूर्व विभागातर्फे ‘नॅशनल पोस्टल वीक’ येत्या ११ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबरदरम्यान साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात अभिनेते वैभव मांगले आणि नाट्यनिर्माता राहुल भंडारे यांच्या पोस्टल तिकिटाचे अनावरण होणार आहे. हा कार्यक्रम ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive