By  
on  

बंगाली देवीच्या रुपातून अपूर्वा नेमळेकरने वेधलं चाहत्यांचं लक्ष

देवीच्या पूजेचा पवित्र सण शारदीय नवरात्र सुरू आहे. नवरात्रोत्सव ९दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मांगल्य आणि चैतन्य घेऊन नवरात्रोत्सवाचं सर्वत्र उ्साही वातावरण पाहायला मिळतंय. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्रींमध्ये नवरात्रौत्सवानिमित्ताने विविध फोटोशूट्स करण्याचा मोठा ट्रेंड रुजू होतोय. यंदा अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर देवींच्या विविध रुपात आपल्याला पाहायला मिळतेय. 

आज नवरात्रीचा पाचवा दिवस. अपूर्वाने आजचा रंग पांढरा. यादिवशी अपूर्वाने बंगाली देवीचं रुप धारण केलं आहे. 

छोट्या पडद्यावरची बहुचर्चित मालिका ‘रात्रीस खेळ चाले’मधील शेवंतानं चाहत्यांच्या मनावर एक वेगळी छाप पाडली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तिचे लाखो चाहते आहेत.

अपूर्वाच्या या देवी रुपातील फोटोंच्या अनोखा सिरीजवर चाहते कौतुकाचा वर्षाव करतायत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive