By  
on  

गोदावरी सिनेमाच्या शिरपेचात मानाचा तुरा, न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिलेक्शन

गोदावरी या सिनेमातून जितेंद्र जोशीने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या सिनेमाशी जोडलेली कलाकार मंडळी आणि उत्तम टीम. या सिनेमाचा डंका आता सातासमुद्रापारही वाजतो आहे. 

 

 

 न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल साठी या सिनेमाची निवड झाली आहे. जितेंद्र जोशीने याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो म्हणतो, ‘भारतातून कॅनडात आणि आता कॅनडातून पुढे न्यूझीलंड कडे गोदावरीचा प्रवाह निघाला आहे.

सांगण्यास आनंद होतोय की, जगभरातल्या चित्रपटांचा गौरव केला जातो अशा मानाच्या न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपल्या गोदावरी चित्रपटाची निवड झालेली आहे.’ यापुर्वी ‘व्हॅन्कुवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल’ साठी या सिनेमाची निवड झाली होती. तसेच या फेस्टीवलमध्ये 'गोदावरी'चा वर्ल्ड प्रिमिअरही होणार आहे. या सिनेमात अभिनेते विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, जितेंद्र जोशी, गौरी नलावडे, प्रियदर्शन जाधव, सखी गोखले, संजय मोने हे कलाकार झळकणार आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive