By  
on  

सोनाली कुलकर्णीचा हा सिनेमा झळकतो आहे ओटीटी प्लॅटफॉर्मवर

सोनाली कुलकर्णीच्या उत्तम सिनेमांपैकी एका हटके विषयावर बेतलेला सिनेमा म्हणजे शटर. या सिनेमात सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ, प्रकाश बरे, राधिका हर्षे, जयवंत वाडकर, कमलेश सावंत यांच्या भूमिका होत्या. हा सिनेमा आता ओटीटीवर येऊ घातला आहे.

 

 

सोनाली कुलकर्णीने याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. ‘प्रतिक्षा संपली. अनेक वर्षं तुम्ही या सिनेमाबाबत विचारत होता. आता तुम्ही प्राईम व्हिडियोवर हा सिनेमा पाहू शकता.’ शटर हा एका मल्याळी सिनेमाचा रिमेक आहे. बंद शटर आड अडकलेल्या दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती अडकतात. त्यावेळी काय घडतं हे या सिनेमात दिसणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive