वय वर्ष ५१ , पण तरुणींनाही लाजवेल असं आहे या अभिनेत्रीचं सौंदर्य

By  
on  

बॉलिवूडप्रमाणेच मराठी मनोरंजन विश्वातसुध्दा अनेक अभिनेत्री वय हा फक्त एक आकडा असल्याचं सिध्द करतायत. यात अनेक नावं घेता येतील. पण सोशल मिडीयावर सतत सक्रीय असलेलं आणि चर्चेत असलेलं एक प्रसिध्द नाव म्हणजे ऐश्वर्या नारकर. 

मराठी मालिका, सिनेमे आणि नाटक अशी अभिनयाची मुशाफिरी करणा-या प्रतिभावान व सौंदर्याचं ऐश्वर्य लाभलेल्या अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. आपण मालिकांमधून विविध व्यक्तिरेखांमधून त्यांना पाहिलंय. मात्र त्या ख-या आयुष्यात त्या कशा मस्त बेधुंद जगतात हे त्यांच्या काही लेटेस्ट फोटोंवरुन पाहायला मिळतं.

पडद्यावर लाडकी आई-सासूबाईंच्या व्यक्तिरेखा साकारणा-या ऐश्वर्या यांचे हे फोटो पाहून तुम्ही अवाक व्हाल.

ऐश्वर्या यांचे  फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. 

त्यांचं प्रत्येक फोटोशूट खुप खास असतं. 

 

वयाची पन्नाशी ओलांडली तरी त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. 

अनेक वर्षांपासून नाटक, मालिका आणि सिनेविश्वात आपल्या अभिनयाची छाप पाडणा-या ऐश्वर्या नारकर यांचा खुप मोठा चाहतावर्ग आहे.

ऐश्वर्या नारकर यांनी नुकतेच आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. चाहते त्यांच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव करतायत. 

ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे मनोरंजनविश्वातलं सर्वात लाडकं कपल. ही सेलिब्रिटी जोडी अनेक मालिका, नाटक आणि सिनेमात एकत्र काम करताना पाहायला मिळते. 

Recommended

Loading...
Share