सिध्दार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे सिनेसृष्टीतलं एक गोड कपल. या सेलिब्रेटी जोडी नेहमीच प्रेक्षकांची लाडकी ठरते. तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर मागच्या वर्षी ही जोडी लग्नबंधनात अडकली. दोघंही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतात. अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो आणि धम्माल रील्स व्हिडीओ चाहत्यांशी ते शेअर करतात.
नुकताच सिध्दार्थने असाच एक धम्माल व्हिडीओ मितालीसोबत शूट केला आहे. अनेकांना ओला टॉवेल बेडवर टाकून जायची सवय असते आणि त्यावरुन त्यांना चांगलाच ओरडाही पडतो. सिध्दार्थनेसुध्दा तसंच केलंय , त्यामुळे मितालीने त्याची चांगलीच शाळा घेतलीय. पुढे मिताली चिडल्यावर त्याने एक फुटकळ विनोद केला व निमूटपणे ओला टॉवेलही घेऊन गेला.
हा खळखळून हसवणारा धम्माल व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालासुध्दा, ही तर कहानी घर घर की, असंच वाटेल. या व्हिडीओवर प्रतिक्रीया करत चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.