By  
on  

देवी सरस्वतीच्या रुपातून अपूर्वा नेमळेकरने वेधलं चाहत्यांचं लक्ष

यंदाच्या नवरात्रौत्वात प्रसिध्द टीव्ही अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर देवीची विविध रुपं आपल्या खास फोटोशूटमधून साकारतेय.  दरम्यान आज नवरात्रौत्सवाच्या अखेरच्या दिवशी अपूर्वाने विदेची देवता सरस्वती देवीचं सुंदर असं रुप धारण केलं आहे. 

सरस्वती देवीच्या रुपातला फोटो शेअर करत अपूर्वा लिहते, "सरस्वती देवी, ही ज्ञान, संगीत, कला, विद्या आणि शिक्षणाची देवी आहे ; ती सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवीपैकी एक आहे. माघ महिन्यातल्या शुद्ध पंचमीला वसंत पंचमी वा श्रीपंचमी म्हणतात. या दिवशी सरस्वतीचा जन्म झाल्याने हा दिवस सरस्वती जयंती म्हणून साजरा केला जातो."

गुलाबी साडी नेसलेल्या देवी सरस्वतीच्या रुपातील अपूर्वाच्या फोटोशूटवर चाहते कौतुकाचा वर्षाव करतायत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive