By  
on  

या मराठमोळ्या अभिनेत्रीचा पतीसोबत सुरुय रोमान्स , व्हिडीओ पाहिलात का?

मराठीतली बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री नेहा पेंडसे अनेक कारणांनी चर्चेत राहिली आहे. मग ते बिग बॉस हिंदीतला स्पर्धेक म्हणून सहभाग असो किंवा पुण्यातील उद्योगपती शार्दूल सिंग बयाससोबतचं लग्न असो.आतासुध्दा पुन्हा ती चर्चेत येण्याचं खास कारण आहे. नेहाने नुकतंच पती शार्दुलसोबतचा एक जबरदस्त व्हिडीओ चाहत्यांशी सेअर केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

 

नेहाने पती शार्दुलसोबत रोमॅण्टिक होतानाचा हा व्हिडीओ आहे. एका रेस्टॉरन्टमध्ये ड्रिंक्सचा आस्वाद घेताना नेहाने पतीला खुल्लम खुल्ला गोड किस केलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

 

नेहाच्या या व्हिडीओवर चाहते आता कौतुकाचा वर्षाव करतायत. पण जेव्हा नेहा शार्दुलसोबत लग्नबंधनात अडकली होती तेव्हा तिला खुप ट्रोल करण्यात आलं होतं. खुप उलट-सुलट कॉमेंट्स करुन नेटक-यांनी नेहाला लग्नानंतर धारेवर धरलं होतं.

 

नेहाने एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं होतं  की तिचा पती शार्दुल सिंग बयास याचा दोन वेळा घटस्फोट झाला आहे. शार्दुलच्या पहिल्या पत्नींचं नाव अनिता असून तीसुद्दा एक व्यावसायिकच आहे. इतकंच काय तर शार्दुलला दोन मुलीसुध्दा आहेत. रिया आणि आलिया. त्याने 2017मध्ये पत्नीपासून घटस्फोट घेतला. त्यामुळे आता नेहा ही त्याची तिसरी पत्नी आहे.

लग्नापूर्वी नेहा आणि शार्दूल हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचा खुलासा तिने एका मुलाखतीत केला होता. आता  त्यांचा सुखाचा संसार सुरु असून दोघंही आपापल्या कार्यक्षेत्रात व्यस्त असल्याचं पाहायला मिळतं. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive