By  
on  

देवीच्या लूकमधील फोटोवर नकारात्मक कमेंट करणा-या व्यक्तीला अपुर्वा नेमळेकरचं चोख उत्तर

यंदाच्या नवरात्रीत शेवंता फेम अपुर्वा नेमळेकरने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अपुर्वाने या नऊ दिवसात देवीच्या विविध रुपांचा लूक केला होता. तिच्या या लूकला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला. काही चाहत्यांनी या फोटोशूटवर कमेंट्समधून आपली नाराजी देखील दर्शवली आहे. या कमेंट्सवर अपूर्वाने चोख उत्तर देखील दिलं आहे. 

 

 

हा चाहता आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘Dislike, Dislike,100% Dislike, आपण एवढं पूजनीय नसतो, सांगितलं ना, including I (मी) की देव देवीच्या face ल आपल face marf करून लावायला, बस झालं नका खेळू आमच्या emotion’s शी. आणि वाटलं तर हा pic बनवून तूम्ही घरात लावा, बघत बसा. पण pl.public वर काहीही नका लादू कळतं नाही एकदा पोस्ट ला कॉमेंट देऊन. आणि जितक्या द तूम्ही माझं comment delete कराल, मी तित्क्यादा हाच same comments, लोकं मधे हया बदल aewrness करणार, मग तूम्ही कुठंही हा marf pic Taka…” 

 

 

यावर अपुर्वानेही दिलेल्या उत्तराची चर्चा आहे. ती आपल्या कमेंटमध्ये म्हणते, ‘मी व माझ्या सहकाऱ्यांनी, प्रत्यक्ष-वा-अप्रत्यक्ष असा कधीच दावा केला नाही आम्ही दैवी व्यक्तिमत्त्वे आहोत. मी, आणि माझे सहकारी निव्वळ कलेचे उपासक आहोत. हा प्रकल्प, हि आमची एक संकल्पना आहे, ज्याच्या माध्यमातून आम्ही, देवीचे विविध रुप आणि त्या विशिष्ट शक्तीपीठाची महती भविकां पर्यंत पोहोचवन्याचा, एक निखळ प्रामाणिक प्रयत्न आहे. आपल्या संस्कृतीचा वारसा लुप्त होत चालला आहे, त्याला उजाळा देण्याचा हा आमचा प्रामाणिक आणि निस्वार्थी प्रयत्न आहे.

ह्या छोट्याश्या प्रकल्पात आम्हा सर्वांचा कोणताही व्यावसायिक हेतू वा फायद्या नाही.अश्या पद्धतीने, अप-समीक्षा उघड पने करणे म्हणजे आपल्या संसकृतीचे अवमान, आवज्ञा होय. वैयक्तिकरित्या एखाद्याला हि संकल्पना किंवा त्याची मांडणी पटली नसेल तर त्याने, दुर्लक्ष करावे, किमान सार्वजनिक व्यासपीठावर असे उदात विचार मांडून इतरांच्या भावनांचा अवमान करू नये.

हिंदू संस्कृतीत सहिष्णुतेला नुसतेच प्राथमिक नाही तर अनन्य साधारण महत्त्व आहे."परस्पर देवो भव" म्हणजेच एक मेकां मध्ये देव पाहा (See God in each other) अशी, आपल्या हिंदू संस्कृती ची शिकवण आहे. तेव्हा माझे व माझ्या सहकाऱ्यांचे आपल्याला वैयक्तिक आवाहन राहील की, आपण आपल्या संस्कृती चे विडंबन करू नये आणि ही अप प्रचिती इथेच थांबवावी ! ’  अपुर्वाच्या या कमेंटवर काही चाहतेही तिला सपोर्ट करताना दिसत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive