आज नवरात्रीचा अखेरचा दिवस. नऊ दिवसाच्या प्रतिक्षेनंतर दस-याचा आनंद साजरा करण्यासाठी प्रत्येकजण उत्साहात असतो. अभिनेत्री अपुर्वा नेमळेकरनेही गेले आठ दिवस देवीची विविध रुपं चाहत्यांच्या भेटीला घेऊन आली आहे. धनाची देवता असलेल्या लक्ष्मीचं रुप अपुर्वाने धारण केलं आहे.
आपल्या पोस्टमध्ये ती म्हणते, ‘लक्ष्मी ही हिंदू धर्मातील ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य, आणि समृद्धी, संपत्ती यांची अधिष्ठात्री देवी आहे. दसरा ,चांगल्याचा वाईटावरील विजयाचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो. दसरा म्हणजेच विजयदशमी . दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. मी अणि माझ्या टीमने केलेला एक प्रामाणिक प्रयत्न. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!’ जांभळ्या कलरच्या साडीतील अपुर्वाचा लूक अत्यंत लोभस दिसत आहे.