मराठी सिनेसृष्टीत सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर आपलं स्थान निर्माण करणारी लाडकी अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी. ती विविध आऊटफिट्समधले फोटो नेहमी चाहत्यांशी शेअर करते. सोनालीच्या प्रत्येक फोटोशूटला चाहते भरभरुन प्रतिसाद देतात. कारण, तिचं प्रत्येक फोटोशूट हे खासच असतं.
विजयादशमीच्या शुभ मुहूर्तासाठी खास साडीत अप्सरा नटली आहे.
या मोती रंगाच्या साडीत सोनालीचा राजेशाही थाट खुलून दिसतोय.
सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. चाहत्यांशी कनेक्ट राहायला तिला आवडतं. या खास फोटोशूटवर चाहचे कौतुकाचा वर्षाव करतायत.