By  
on  

फरदीन खानचं कमबॅक, रितेशसह प्रिया बापट झळकणार या हिंदी सिनेमात

फिदा, नो एन्ट्री, कुछ तुम कहो कुछ हम, हे बेबी, दुवल्हा मिलगएा, शादी नं १, जंगल आदि सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता फरदीन खान तुमच्या चांगलाच लक्षात असेल. बराच काळ बॉलिवूडपासून दूर असलेला हा अभिनेता आता पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. विस्फोट असं त्याच्या आगामी सिनेमाचं नाव आहे. जवळपास ११ वर्षांनंतर तो आता पुन्हा झळकणार आहे. त्याच्यासोबत या सिनेमात आपले दोन मराठमोळे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. हरहुन्नरी अभिनेता रितेश देशमुख आणि सशक्त अभिनेत्री प्रिया बापट यांच्या यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 

अभिनेत्री प्रिया बापटने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबतचा फोटो शेअर केला आहे. ‘विस्फोट’ हा एक थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार करणार आहेत. या चित्रपटाविषयी बोलताना ते म्हणाले, ‘एक निर्माता म्हणून मी नेहमी एका वेगळ्या विषयाच्या शोधात असतो. आणि विस्फोट हा चित्रपट थोडा वेगळा आहे.’

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

प्रिया बापटने  शेअर केलेल्या या फोटोवर चाहते कौतुकाचा वर्षाव करतायत.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive