धक्कादायक! या मराठी अभिनेत्रीची झालीय अशी अवस्था

By  
on  

अलिकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतलेली 'पाहिले न मी तुला' ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात असेल. अभिनेता शशांक केतकर यात खलनायिकी भूमिकेत दिसला होता. यात अनिकेतच्या आईची म्हणजेच घरकाम करणा-या उषा मावशीची अर्थातच मनूच्या सासूची महत्त्वपूर्ण भूमिका  साकरणा-या अभिनेत्री म्हणजे वर्षा दांदळे. या अभिनेत्रीने नुकतीच सोशल मिडीयावरुन एक मन हेलावून टाकणारी बातमी चाहत्यांशी शेएर केली आहे. 

वर्षा दांदळे यांनी आपल्या अपघाताची बातमी नुकतीच इन्स्टाग्राम वर शेअर केली आहे. त्यात या अपघाताने त्यांची प्रकृती अधिकच खालावली असल्याचे दिसून येते. या अपघातात त्यांच्या पाठीला जबरदस्त दुखापत झाली आहे त्यामुळे मणक्याच्या त्रास त्यांना वाटू लागला आहे शिवाय उजव्या पायाला देखील गंभीर दुखापत झाली आहे.या दुखापतीमुळे त्या अंथरुणालाच खिळून आहेत. अपघातामुळे त्यांची परिस्थिती देखील खूपच नाजूक झाली असल्याचे त्या सांगतात. सध्या कुठलीच हालचाल होत नसल्याने त्या आता झोपूनच आराम करत आहेत. 

वर्षाताई लवकर ब-या व्हाव्यात असे चाहते मनापासून  प्रार्थना करत आहेत 

 

झी मराठी वाहिनीवरील नांदा सौख्य भरे या मालिकेतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. या मालिकेत त्यांनी साकारलेली वच्छी अत्याची भूमिका खूपच गाजली होती. याच नावाने त्यांना प्रेक्षकांनी ओळख दिली. 

Recommended

Loading...
Share