मराठी सिनेविश्वात आपल्या बिनधास्त आणि बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिध्द असलेली अभिनेत्री हेमांगी कवी नेहमीच चर्चेत असते. सोशल मिडीयावर तिची प्रत्येक पोस्ट व्हायरल होते. नुकताच दसरा हा आपला सर्वात मोठा साण साजरा झाला. दस-याला सर्वत्र पारंपारिक महाराष्ट्रियन लुक्समध्ये अनेकांनी फोटोशूट केलं. हेमांगीनेसुध्दा दस-याच्या शुभ मुहूर्तावर पूजेसाठी खास जरीकाठाची सुंदर अशी नऊवारी साडी नेसली होती. या साडीतले अनेक अप्रतिम फोटो तिने चाहत्यांशी शेअर केले. सर्वांनी त्यावर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षावही केला.
परंतु हेमांगीच्या नऊवारीतील या फोटोंमुळे तिला एका महिलेनेच ट्रोल केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे हेमांगीने तिला जशाच तसं उत्तर दिलं आहे. हेमांगीला या महिलेची कमेंट खुपच खटकली. मग तिनेही त्यांचा आदर राखत त्यांना सुनावलं.
मात्र चौथ्या फोटोतील पदर जरा नीट घेतला असता तर अजून छान दिसला असता असं म्हटलं होतं. महिला म्हणाल्या की, खूप सुंदर दिसतेस. साधेपणातलं तुझं सौंदर्य छानच. तुझे विचार ही खूप छान आहेत. थोडंसं खटकलं- मराठमोळ्या पेहरावावर पदर ही नीट घेतला असतास तर अजुन छान दिसलं असतं. यावर हेमांची पुरती चिडली आणि त्यांची कान उघडणी केली. यावर हेमांगी म्हणाली की, पदर नीट घेतला असता म्हणजे? हे एक बाईच कसं बोलू शकते? याचं नवल वाटतं मला! ते ही तुमच्या सारख्या sleeveless घातलेल्या बाई कडून यावं? मराठमोळ्या संस्कृतीत साडी वर sleeveless blouse कधी होता जरा सांगता का? माझं अज्ञान तेवढंच दूर होईल!