‘ती परत आलीये’ ही छोट्या पडद्यावरची हॉरर-थ्रीलर पठडीतली मालिका प्रेक्षकांच्या खुप पसंतीस पडतेय. पहिल्या भागापासूनच या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. निर्जन रिसॉर्टवर अडकलेल्या मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपची ही गोष्ट आहे. तब्बल दहा वर्षांनी ते एकत्र आले आहेत.
रिसॉर्टवर अडकल्यापासून या सर्व मित्र मैत्रिणींच्या आयुष्यात खूप काही घडतंय. घरच्या मंडळींशी, कुटुंबाशी कोणाचा काहीच कॉन्टॅक्ट नाहीय. इथे फक्त आधार आहे तो एकमेकांचाच. आधी अभ्याचा खून झाला त्या धक्क्यातून सावरले न सावरले तोच मॅण्डीचा मृतदेह स्विमींगपूलमध्ये आढळला. अनेक अनपेक्षित घटनांनी दोस्तांना या रिसॉर्टवर हादरुन सोडलं आहे. त्यांच्यासमोर अनेक अनुत्तरीत प्रश्न आहेत. अशातच विकीने सर्वांचे फोन त्यांच्याकडून घेऊन रात्री झाडांवर रेकॉर्ड करण्यासाठी ठेवले होते. पण कोणाच्याच फोनमध्ये जास्त काही रेकॉर्ड झालं नाही. पण अनुच्या फोनमधल्या व्हिडीने लक्ष वेधून घेतलं. यात एक मास्क घातलेला इसम सर्वांनाच दिसला. सत्याला मचाणावरुन ढकलून देणारा, सायलीने ज्याला डांबवून ठेवलेला आणि अनूवर हल्ला करणारा तोच आहे त्यांनी सांगितलं. पण सर्वांनाच याला आधी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. त्यात अनूने हॉरर थीम पार्टीत या मास्कधारीला आपण कॉलेजमध्ये असताना पाहिल्याचं आठवलं.
अनुची आणि त्याची तर वॉशरुममध्ये समोरासमोर भेट झाल्याचंसुध्दा तिला लख्ख आठवंय. सर्वजण ते जुने फोटो अल्बम शोधायला लागतात, परंतु नेमका त्याचाच फोटो अल्बमधून गायब असल्याचं समोर आलंय. आता एकमेव पुरावा कोणी गहाळ केलाय याचं सर्वांनाच कोडं पडलंय.
दोस्तांच्या दहा वर्षांपूर्वीच्या आयुष्यातही ही मास्कधारी व्यक्ती त्यांच्या कॉलेजमध्ये डोकावली होती. पण आता त्याच व्यक्तीने पुन्हा वर्तमानात त्यांचा पिच्छा सुरु केलाय. पुढे नमकं काय घडणार हे पाहणं खुप उत्कंठावर्धक झालं आहे.